INDW vs NZW :- माजी कर्णधार मिताली राजचा सर्वकालीन राष्ट्रीय विक्रम मोडून भारताच्या मालिका विजयात सलामीवीर स्म्रीती मंधानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताने शेवटच्या व तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारतासमोर विजयासाठी 233 धावांचे लक्ष्य होते. भारताने 44.2 षटकात 4 गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले.
या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 232 धावा केल्या. न्यूझीलंडने सुझी बेट्सची (4 धावा) विकेट लवकर गमावली. सायमा ठाकोरने लॉरेन डाऊनला बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. कर्णधार सोफी डिव्हाईन 9 धावा करून बाद झाली. जॉर्जिया प्लिमरने 39 धावा केल्या.
दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या
ब्रूक हॅलिडेने सर्वाधिक 86 धावांची खेळी खेळली. तिने आपल्या खेळीदरम्यान 3 षटकार आणि 9 टौकार मारले. तसेच मॅडी ग्रीनने 15 धावांचे योगदान दिले. अखेरीस इसाबेला गेज (25) आणि ली ताहुहू (24) यांनी संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. भारताकडून दीप्ती शर्माने तीन, तर प्रिया मिश्राने दोन विकेट्स घेतल्या. सायमा आणि रेणुका यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
मंधानाची शतकी खेळी
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शेफाली वर्माची विकेट लवकर गमावली. शेफाली अवघ्या 12 धावा करून बाद झाली. यानंतर स्म्रीती मंधानाला यास्तिका भाटिया (35) ची साथ मिळाली. या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, मंधानाने तिचे 8 वे वनडे शतक झळकावले. 10 चौकारांच्या मदतीने तिने 100 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर 59 धावा करून नाबाद राहिली. जेमिमाह रॉड्रिग्जने 22 धावा केल्या. या डावात हॅना रोने दोन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…