आयपीएल 2025 च्या लिलावाची तारीख जवळ येत आहे. एकीकडे खेळाडूंची धाकधूक वाढली असताना, दुसरीकडे संघही आपापले प्लॅनिंग करण्यात व्यस्त आहेत. असे अनेक खेळाडू आहेत जे रिटेन्शनच्या दोन दिवस आधीपर्यंत फ्रँचायझीच्या फोनची वाट पाहत आहेत. तसेच काहींना यावेळी संघाकडून कायम ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोणाला कायम ठेवले जाईल आणि कोणाला नाही, हा नंतरचा विषय आहे. मात्र, त्याआधी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की सध्या कोणत्या संघाकडे किती पर्स शिल्लक आहे?
गेल्या वेळी जेव्हा आयपीएलसाठी लिलाव झाला तेव्हा संघांच्या पर्समध्ये 100 कोटी रुपये देण्यात आले होते. यातून संघ त्यांचे सर्व खेळाडू खरेदी करू शकत होते. यानंतरही काही संघांनी आपले संपूर्ण पथक तयार केले आणि पैशांचीही मोठी बचत केली. यावेळी पर्समध्येही 100 कोटींवरून 120 कोटी रुपयांची म्हणजेच थेट 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, संघांकडून सोडण्यात येणाऱ्या खेळाडूंना दिलेले पैसेही थेट पर्समध्ये जमा होणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. संघाकडे सध्या 9 कोटी 90 लाख रुपये शिल्लक आहेत. म्हणजे संघाने आपले संपूर्ण पथक अतिशय किफायतशीरपणे बनवले आणि पैसेही वाचवले. सर्वात कमी पैशांची बचत करणाऱ्या संघाबद्दल बोलायचे झाले तर ते राजस्थान रॉयल्स आहे. लिलावादरम्यान संघाने आपल्या खेळाडूंवर प्रचंड खर्च केला, त्यामुळे संघाकडे फक्त 20 लाख रुपये शिल्लक आहेत. संघाला यावेळी काही महागडे खेळाडू सोडावे लागतील, तरच काही पैसे त्याच्या खिशात येतील.
पाचवेळा चॅम्पियन संघ सीएसकेबद्दल बोलायचे झाले तर या संघाकडे सध्या एक कोटी रुपये शिल्लक आहेत. गुजरात टायटन्सकडे अजूनही 7 कोटी 85 लाख रुपये शिल्लक आहेत. जर आपण केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोललो तर या संघाकडे सध्या 1 कोटी 35 लाख रुपये शिल्लक आहेत. लखनऊच्या पर्समध्ये फक्त 95 लाख रुपये शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या पर्समधील 1 कोटी 50 लाख रुपये वाचवले आहेत. पंजाब किंग्जकडे अद्याप 4 कोटी 15 लाख रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 2 कोटी 85 लाख रुपये वाचवले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादकडे 3 कोटी 20 लाख रुपये शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…
आरसीबीच्या ‘या’ स्टार खेळाडूने रणजी ट्राॅफीत 68 चेंडूत झळकावले शानदार शतक!