भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सरफराज खानच्या जिद्दीने टीम इंडियाला यश मिळवून दिले. सरफराजच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतला आणि या निर्णयामुळे न्यूझीलंडचा फलंदाज विल यंगला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. विल यंग 18 धावा करून रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर झेलबाद झाला होता. यष्टीरक्षक रिषभ पंतने त्याचा झेल घेतला होता.
त्याचे झाले असे की, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सरफराज खान आणि विराट कोहली यांनी कर्णधार रोहित शर्माला डीआर घेण्यासाठी मनवले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना डावाच्या 24 व्या षटकात घडली, ज्यामध्ये अश्विनने या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. हा चेंडू मधल्या स्टंपवर आदळल्यानंतर लेग साइडच्या दिशेने गेला आणि क्रीजवर असलेल्या विल यंगने फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जो तो चुकला. यानंतर लगेचच भारतीय खेळाडूंनी बादचे जोरदार आवाहन केले, मात्र कर्णधार रोहित रिव्ह्यूसाठी घेण्यास कचरत होता.
यावेळी, सरफराज खानने रोहितला डीआरएस घेण्यासाठी राजी केले. त्याने रोहितला समजावून सांगितले की चेंडू यंगच्या बॅटपासून दूर जात आहे. रोहितलाही सरफराजचा सल्ला पटला आणि त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. डीआरएस रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू खरोखरच विल यंगच्या बॅटपासून दूर जात होता आणि पंचांना बादचा निर्णय मागे घ्यावा लागला.
in #2nd_Test
Keeper Bowler Captain kisi ko nahi Suna
Sarfaraz khan Bola Please Mujh Par Bharosa Karo.#INDvsNZ pic.twitter.com/wkyTUNmMqp— A. Wahid (@A__Wahid) October 24, 2024
अशाप्रकारे सरफराज खानने कर्णधार रोहितचा विश्वास जिंकला. दुसऱ्या कसोटीत केएल राहुलच्या जागी सरफराज खानला संधी मिळाली आहे, कारण त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते.
सरफराजने ज्या विश्वासाने कर्णधार रोहितला डीआर घेण्यासाठी तयार केले, ते पाहून समालोचन करत असलेला न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डौल प्रभावित झाला. तो समालोचनात म्हणाला की, “सरफराज खान आणि विराट कोहली यांना विल यंग बाद झाल्याची पूर्ण खात्री होती. एवढी छान सकाळ केल्याबद्दल सरफराजचे अभिनंदन.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; “मला काय माहिती, त्याला हिंदी येते” भारतीय खेळाडूचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
भारताच्या माजी कर्णधारानं अचानक निवृत्ती जाहीर केली, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम
वॉशिंग्टन सुंदरनं सात विकेट घेत मिळवलं दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान, 7 वर्षांनंतर असं प्रथमच घडलं!