आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही तासांतच सुरू होईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील भव्य अंतिम सामना रविवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळला जाईल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेल्या या स्टेडियममध्ये १ लाखांहून अधिक लोक बसू शकतात शिवाय देशभरातून भारतीय रेल्वेने विशेष गाड्या पुरवल्यामुळे चाहत्यांची उपस्थिती ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाला यजमान असल्याने चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा असेल. भारत सलग दुसरे जेतेपद जिंकून अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करेल. . मात्र या महाअंतिम सामन्यातील विजेता कोण ठरणार हे संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ठरणार आहे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. असं आम्ही नाही तर या मैदानातील आकडेवारी सांगत आहे.
अहमदाबादमधील या विश्वचषकाच्या १० व्या आवृत्तीतील हा सातवा सामना आहे. मागील ६ सामन्यांमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ वेळा विजय मिळवला आहे, तर पाठलाग करणाऱ्या संघाने २ वेळा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कोण फलंदाजी करेल याचा निर्णय महत्त्वाचा असेल.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात संघाला अंतिम फेरीत नेले आहे. हा त्याचा ५२ वा टी२० सामना आहे. त्याने ५१ पैकी ४१ सामने जिंकून भारताची प्रगती निश्चित केली आहे. विजयाची टक्केवारी ८४% आहे आणि आता सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारत टी२० विश्वचषक जिंकेल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.






