---Advertisement---

IND vs NZ; भारताचा अभूतपूर्व विजय..! 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर मोहोर!

---Advertisement---

(IND vs NZ Champions Trophy 2025 Final) टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 251 धावांचा टप्पा गाठला. डिरेल मिशेल (63) आणि मायकेल ब्रेसवेल (53) यांनी संघाला भक्कम पाया दिला. तर, भारतासाठी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विरोधी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. शुबमन गिलसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी 105 धावांची निर्णायक भागीदारी केली. रोहितने 76 धावा फटकावत सामना भारताच्या बाजूने झुकवला, तर गिलने संयमी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणले.

गिल बाद झाल्यानंतर भारतीय संघावर दबाव आला. विराट कोहली अवघ्या 1 धावांवर माघारी परतला, ज्यामुळे काही वेळ भारतीय संघ बॅकफूटवर गेला. मात्र, श्रेयस अय्यर (48) आणि अक्षर पटेल (29) यांनी डाव सावरत 61 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. शेवटी रवींंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी संघाला विजयी किनाऱ्यापर्यंत पोहोचवले.

या विजयासह रोहित शर्माने एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचा हा शानदार विजय क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला आहे.

हेही वाचा-

श्रेयस अय्यर अर्धशतकापासून मुकला; सामना रोमांचक वळणावर
विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॅाफी फायनलमध्ये सुपर फ्लॅाप? पहा आकडेवारी काय म्हणतेय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---