भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना गुवाहटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
मालिकेतील दोन्ही सामन्यात किवींना वाईट पराभवास सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 48 धावांनी तर दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने पराभव झाला. दरम्यान या निर्णायक सामन्यात किवींचे लक्ष विजयावर असेल.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- डेव्हॉन कॉनवे, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, इश सोढी, जेकब डफी
बातमी अपडेट होत आहे…..




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा