सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आहे. मालिका सुरू झाली तेव्हा भारतीय संघ घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या कसोटीत भारताला 8 विकेट्सने, तर दुसऱ्या कसोटीत 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. याच कारणामुळे टीम इंडियाने 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. आता तिसरा कसोटी सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर होणार आहे. क्लीन स्वीप टाळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. तो फ्लॉप ठरला आहे. तर सोबतचा जोडीदार यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीत 77 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. जयस्वाल जो पर्यंत मैदानात होता तोपर्यंत टीम इंडिया स्पर्धेत होती. पण तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी पडली. तिसऱ्या कसोटीतही हे दोन्ही खेळाडू सलामी देताना दिसू शकतात.
शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत तो विशेष काही दाखवू शकला नाही. त्याने केवळ 30 आणि 23 धावांची खेळी खेळली. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर असणार हे जवळपास निश्चितच आहे. कोहलीने पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. मात्र दुसऱ्या कसोटीत तो धावा करण्यात अपयशी ठरला आणि दोन्ही डावात तो किवी फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरचा बळी ठरला.
यष्टिरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपवली जाऊ शकते. पंतने पहिल्या कसोटीत चांगली फलंदाजी करत 99 धावा केल्या. सरफराज खानने पहिल्या कसोटीत 150 धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बीसीसीआयने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याची निवड केली आहे.
न्यूझीलंडनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचे आहे. जिथे त्यांना पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अश्यावेळी टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची गरज आहे. बुमराहने सलग चार कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा त्याला विश्रांती देऊ शकतात. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही बुमराहला विश्रांती देण्याची मागणी केली असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप
हेही वाचा-
BGT मालिकेपूर्वी संघाला धक्का! यष्टीरक्षक फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
IND VS AUS; भारताची डोकेदुखी वाढली, BGT मालिकेपूर्वी कांगारुंना मिळाला नवा सलामीवीर!
गॅरी कर्स्टनच्या अचानक राजीनाम्यानंतर केविन पीटरसनने पाकिस्तान बोर्डाला सुनावले, म्हणाला…