आज (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे न्यूझीलंडने भारतीय संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 22 धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथीने (Tim Southee) भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करत एक विक्रम केला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 274 धावांचे मोठे आव्हान दिले होते. यावेळी भारताकडून तिसऱ्या विकेटसाठी 274 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट 25 चेंडूत फक्त 15 धावा करुन साऊथीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
त्यामुळे साऊथी विराटला सर्व क्रिकेट प्रकारात सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज बनला आहे. साऊथीने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 वेळा बाद केले आहे. त्याच्या पाठोपाठ इंग्लंडच्या जेम्स अँडरसन (James Anderson) आणि ग्रॅमी स्वानने (Graeme Swann) विराटला 8 वेळा बाद केले आहे.
तसेच मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel), नॅथन लायन (Nathon Lyon), ऍडम झंपा (Adam Zampa) आणि रवी रामपाल (Ravi Rampaul) यांमी विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद केले आहे.
तसेच वनडेमध्ये साऊथी आणि रामपालने सर्वाधिक 6 वेळा बाद केले आहे. त्याचबरोबर थिसरा परेरा आणि झंपाने विराटला वनडेत 5 वेळा बाद केले आहे.
पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडच्या सर्वात उंच गोलंदाजाने केली मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी
वाचा👉https://t.co/eyXaunooCP👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ #KyleJamieson— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करणाऱ्या मुलाच्या 'त्या' व्हिडिओवर चहलने केली ही कमेंट…
वाचा- 👉https://t.co/wlkpsHbq5V👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020