विराट कोहली वनडे विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात महत्वपूर्ण धावा करू शकला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात चांगली सुरुवात मिळवून दिली. विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर त्याने 59 चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. सोबतच एक अशी खास कामगिरी केली, जी केवळ त्याला एकट्यालाच जमली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 50 विंका त्यापेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी आढव्यांदा 50 धावांपेक्षा मोठी खेळी केली. सोबतच सचिन तेंडुलकर याचा खास विक्रम मोडीत काढला. सचिनने 2003 विश्वचषकात सर्वाधिक 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची खेळी केली होती. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन यानेही 2019 विश्वचषकात 7 वेळा 50 धावंपेक्षा मोठी खेळी केली होती.
वनडे विश्वचषक हंगामात सर्वाधिक वेळा 50+ धावांची खेळी करणारे फलंदाज
8 – विराट कोहली (2023)*
7 – सचिन तेंडुलकर (2003)
7 – शाकिब अल हसन (2019)
दरम्यान, उभय संघांतील हा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला, तर शुबमन गिल 49 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. (Virat Kohli becames the 1st Player to hit EIGHT 50+Scores in a World Cup Edition. )
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
वीर विराट! बनला वनडेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज, विश्वविजेत्या कर्णधाराचे आकडे पडले फिके
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये