विराट कोहली याच्या 50व्या शतकाची चर्चा सर्वत्र होत आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023च्या पहिल्या उपांत्य सामन्यात विराटने न्यूझीलंडविरुद्ध ही खेळी केली. हा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर स्टेडियम तुडूंब भरले होते. हा रोमांचक सामना ऑनलाईन पाहण्याऱ्यांची संघ लक्षणिय ठरली. डिजनी+हॉटस्टारवर हा सामना पाहणाऱ्यांनी एक नवा विक्रम केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली याने कारकिर्दीतील 50वे शतक नावावर केले. सोबतच सचिनच्या सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराटचे ही विक्रमी खेळी पाहण्यासाठी डिजनी+हॉटस्टारवर तब्बल 50 मिलियन दर्शकांनी हजेरी लावली. हा आकडा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम आहे. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान, 44 मिलियन दर्शकांनी डिजनी+हॉटस्टारवर हा सामना पाहिला होता. पण बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जुने सर्व विक्रम मोडत नवा विक्रम घडला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावा केल्या. यात सलामीवीर रोहित शर्मा याने 47, शुबमन गिल 80*, विराट कोहली 117, श्रेयस अय्यर 105* आणि केएल राहुल याने 39* धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडसाठी टिम साऊदी याने 100 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने 1 विकेट घेतली. (IND vs NZ. World Cup semi-final viewers made a world record, during Virat’s century,)
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद