आशिया कप 2025 मधील 12 वा सामना आज म्हणजेच शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आधीच सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरली आहे, त्यामुळे हा सामना भारतासाठी सरावा सारखा असेल. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात जसप्रीत बुमराहसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन इतरांना संधी देतील अशी अपेक्षा आहे. भारत ग्रुप-अ मध्ये पहिल्या स्थानावर असून विजय मिळवून जिंकण्याची हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात असेल.
या सामन्याची सुरुवात रात्री 8 वाजता होईल, तर टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार 7:30 वाजता मैदानात उतरतील. हा सामना भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येईल. तसेच, डीडी स्पोर्ट्सवर मोफत प्रक्षेपणाचा आनंद घेता येईल. ऑनलाईन पाहण्यासाठी चाहत्यांना SonyLIV अॅपवर स्ट्रीमिंगची सुविधा मिळेल, मात्र त्यासाठी सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे.
भारतीय संघ:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा
ओमान संघ:
आमिर कलीम, जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), वसीम अली, हसनैन शाह, शाह फैसल, जितेन रामानंदी, आर्यन बिष्ट, शकील अहमद, समय श्रीवास्तव, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, करण सोनावले, आशीष ओडेदरा, मोहम्मद इमरान, जिक्रिया इस्लाम, नदीम खान, सुफियान यूसुफ






