येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघही स्पर्धेसाठी तयार आहे. स्पर्धेचा पहिला पाकिस्तानचा विरुद्ध नेपाळ संघात होणार आहे. पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0ने जिंकली आहे. दुसरीकडे, नेपाळ संघाने एसीसी पुरुष प्रीमिअर कपमध्ये विजय मिळवला होता. मात्र, नेपाळला पाकिस्तानशी टक्कर देणे सोपे नसेल. पाकिस्तान त्यांचा दुसरा सामना भारताविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानचे 3 खेळाडू भारतीय संघासाठी मोठा धोका ठरू शकतात. हे 3 खेळाडू कोण आहेत, त्याबाबत आपण जाणून घेऊयात…
भारतीय संघासाठी धोका ठरू शकणाऱ्या 3 पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये बाबर आझम, इमाम उल हक आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. मात्र, यांच्याकडून भारतीय संघाला काय धोका आहे? तेच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
1. इमाम उल हक
इमाम उल हक (Imam ul Haq) हा पाकिस्तान संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेक प्रसंगी संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 62 वनडे सामन्यात 2884 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 9 शतके आणि 18 अर्धशतकांचा पाऊसही पाडला आहे. इमामने नुकत्याच खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 91 धावांची खेळी साकारली होती. त्याने सलग 2 अर्धशतके ठोकली. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे इमाम भारताविरुद्ध शानदार प्रदर्शन करू शकतो.
2. बाबर आझम
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारतासाठी धोका ठरू शकणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू म्हणजे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) होय. बाबर आशिया चषकात विरोधी संघांसाठी सर्वात मोठा धोका आहे. तो विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. त्याने 103 वनडे सामने खेळले असून त्यात 5202 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 18 शतके आणि 28 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान 158 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
3. शाहीन आफ्रिदी
अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) पाकिस्तानची सर्वात मोठी ताकद आहे. त्याने पाकिस्तानकडून 39 वनडे सामने खेळताना 76 विकेट्स नावावर केल्या आहेत. शाहीनच्या वेगापुढे टिकणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसेल. त्याने 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतही चांगली गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या सामन्यात 9 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दुसऱ्या सामन्यात 58 धावा खर्चून 2 विकेट्स आणि तिसऱ्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या.
एवढंच काय, तर वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांनीही आफ्रिदीचे कौतुक करत तो विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज असेल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे फलंदाज आशिया चषक आणि विश्वचषकात आफ्रिदीचा कसा सामना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ind vs pak asia cup 2023 this pakistani cricketer game changer for pakistan against india)
हेही वाचलंच पाहिजे-
ट्रॉफी जिंकण्याविषयी विराटचे रोखठोक भाष्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो, मला…’
हे काय केलंस! ‘दादा’ने एशिया कपसाठी निवडली भारताची सर्वोत्तम Playing 11, पण फॉर्ममधील खेळाडू संघातून बाहेर