क्रिकेटटॉप बातम्या

पाकिस्तानची वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी, अशिया चषकापूर्वीच लॉन्च केली नवीन जर्सी

विश्वचषक 2023 ऑक्टोंबर महिन्यात 5 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व क्रिकेट संघ सज्ज झाले आहेत. त्यात पाकिस्तानचा क्रिकेट संघ मोठ्या प्रमाणात सज्ज झालेला दिसत आहे. आशिया चषका पूर्वीच पाकिस्तान संघाने विश्वचषकसाठी आपली जर्सा प्रदर्शित केली आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याचे फोटो शेअर केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम (Babar Azam), शादाब खान (Shadab Khan) आणि मोहम्मद नसीम (Mohammad Nasim) यांचा फोटोशुट केलेला फोटो शेअर केला आहे. याशिवाय या फोटोत पाकिस्तानी महिला संघाच्या कर्णधारासह एक खेळाडू दिसत आहेत. फोटोमध्ये या खेळाडूंनी पाकिस्तानची नवी जर्सी घातली आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीवर आपला प्रतिक्रीया देत आहेत.

14 ऑक्टोंबरला असणार भारत आणि पाकिस्तान आमने-सामने
5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 सुरू होत आहे. याआधी 4 ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 14 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ खेळणार आहेत.

याआधी आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. आशिया चषकात भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान दोन्ही संघानी आपला संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची चौथ्या क्रमांकाची समस्या आता सुटली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. श्रेयस किंवा राहुल हे दोघेही चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतात यामुळे अनेक दिवसांपासून भारतासाठी उपस्थीत असलेला सुटलेला दिसत आहे. (pakistan cricket team launch jersey for world cup 2023)

महत्वाच्या बातम्या-  
ये दोस्ती हम नही छोडेंगे! चहलला संघात स्थान न दिल्याने, डिव्हिलियर्सने व्यक्त केली नाराजी 
Virat Kohli । आशिया चषकात न्यू लूकमध्ये दिसणार किंग कोहली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Related Articles