---Advertisement---

भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पराकोटीचा आनंद, ट्वीट करत म्हणाले…

On: मंगळवार, सप्टेंबर 12, 2023 12:33 PM
CM-Yogi-Adityanath
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने पाकिस्तानला 228 धावांनी ठेचले. भारताच्या या विजयाचे खरे शिल्पकार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि कुलदीप यादव हे ठरले. या विजयानंतर चोहो बाजूंनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव झाला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. त्यांनी ट्वीट (एक्स) करत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले अभिनंदन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी ट्विटर अकाऊंटवरून भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “आशिया चषक 2023 स्पर्धेत आज शानदार आणि ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन. जय हिंद.”

https://twitter.com/myogiadityanath/status/1701287589024768173?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1701287589024768173%7Ctwgr%5Efcdb84d1728e6cd6cba729ccd6b02bf81eb44cd5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fheadlines-uttar-pradesh-chief-minister-yogi-adityanath-congratulates-team-india-for-biggest-odi-win-against-pakistan-in-asia-cup2023-23528226.html

विराट-राहुल चमकले
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी झाली. त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनीही चमकदार कामगिरी केली. विराटने नाबाद 122 धावा चोपत त्याच्या वनडे कारकीर्दीतील 47वे शतक ठोकले. तसेच, जवळपास 5 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणाऱ्या राहुलनेही नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यामुळे भारताने 2 विकेट्स गमावत 356 धावा केल्या.

कुलदीपच्या फिरकीची जादू
फलंदाजांच्या विस्फोटक प्रदर्शनानंतर भारताच्या गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांवर पूर्णपणे दबाव बनवला. बुमराहने इमाम उल हक याला गिलच्या हातून झेलबाद केले. तसेच, कुलदीप यादव याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानी स्टार फलंदाजांना अडकवले. कुलदीपने यावेळी 8 षटके गोलंदाजी करताना 25 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, हार्दिक पंड्या यानेही शानदार गोलंदाजी करत बाबर आझम याला तंबूचा रस्ता दाखवला. याव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर याने मोहम्मद रिझवान याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. (ind vs pak asia cup 2023 uttar pradesh chief minister yogi adityanath congratulates team india for biggest odi win against pakistan)

हेही वाचा-
‘या’ 5 धुरंधरांमुळेच भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड, नावांसह कामगिरीही पाहा
श्रीलंकेविरुद्ध खेळणार का? पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर खुद्द विराटनेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---