आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्ट पासून होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात खेळला जाईल. भारताला पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी विविध क्षेत्रांमधील दिग्गज यूएईमध्ये उपस्थित राहू शकतात. तसेच भारतीय खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसी देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया ज्या त्यांच्या जोडीदाराला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावू शकतात.
ईशा नेगी –
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रॉटेला हिच्या विधानानंतर पंतविषयी अनेक बातम्या माध्यांतून समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता ईशा नेगी (Isha Negi) तिचा जोडीदार पंतला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावू शकते. यापूर्वी आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या काही सामन्यात ईशा उपस्थित राहिली होती. रिषभ पंत () याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीये.
नताशा स्टॅनकोविक –
भारतीय संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू नताश स्टेनकोविक (Natasha Stankovic) दुबईमध्ये दिसू शकते. ती नुकतीच म्हटली आहे की, आशिया चषकासाठी हार्दिकने घर सोडल्यानंतर तिला त्याची आठवण येत आहे. अशात ती आशिया चषकादरम्यान यूएईत दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
धनश्री वर्मा –
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) हिला काही दिवसांपूर्वी डान्स करताना दुखापत झाली आहे. ती सध्या चहसोबत दुबईला गेली आहे. दुखापत झालेली असली, तरी ती सामना पाहण्यासाठी मैदानात मात्र येऊ शकते. काही दिवसांपूर्वी चहल आणि धनश्रीच्या ब्रेक अपच्या चर्चा रंगल्या होत्या. अशात धनश्रीने जर मैदनात हजेरी लावली, तर या अफवा पूर्णपणे नाहीशा होतील.
दीपिका पल्लीकल –
भारताची स्कॅश खेळाडू दीपिका पल्लीकल (deepika pallikal) देखील तिचा पती दिनेश कार्तिक याला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावण्याची शक्यता आहे. याआधी दीपिका आयपीएलदरम्यान कार्तिकचा संघ आरसीबीचे सामने पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहिली होती. तिने नुकत्याच पार पडलेल्या कॉमवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
रितिका सजदेह –
रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) त्याच्यासोबत असते. कारण ती रोहितच्या मॅनेजरची भूमिका देखील पार पाडत असते. रिताक आणि मुलगी समायरा शक्यतो नेहमीच रोहित विदेश दौऱ्यावर असताना त्याच्या सोबत असतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकासाठी अशी आहे भारताची नवी जर्सी, लोगोवर लावलेल्या ३ स्टारचे आहे महत्त्व
पाकिस्तानला दुखापतींचे ग्रहण, आफ्रिदीनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
आशिया चषकापूर्वी धोनीच्या आठवणीत कोहली भावूक; म्हणाला, ‘७+१८, आमची भागीदारी…’