भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रविवारी (10 सप्टेंबर) कोलंबोमध्ये खेळला जात आहे. आशिया चषकाच्या ग्रुप स्टेजनंतर आता सुपर फोर फेरीत हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने आहेत. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी कर्णधार रोहित आणि शुबमन गिल यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. पाकिस्तानची ताकद असलेला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सुरुवातीच्या षटकांमध्ये संघासाठी महागात पडला.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने आपल्या कोट्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये तब्बल 31 धावांची खर्च केल्या. यात 6 चौकार आणि 1 षटकार होता. दरम्यान ही पहिली वेळ आहे, जेव्हा शाहीन आफ्रिदीच्या कोट्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये एकूण 7 चेंडू सीमारेषेबाहेर पाढवले आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्या संघाला या सामन्यात चांगली सुरुवात देण्यात यशस्वी ठरले, असे आपण म्हणू शकतो. पावर प्लेच्या 10 षटकांनंतर बारताची धावसंख्या नाबाद 61 होती. रोहितने 18*, तर गिलने 41* धावा केल्या होत्या. (IND vs PAK First time ever Shaheen Shah Afridi has been hit for 7 Boundaries in his first 3 overs in ODIs. )
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
माजी दिग्गजाने भारतीय फलंदाजांना सांगितला शाहीन आफ्रिदीचा तोडगा; म्हणाला, ‘पहिल्या 15 ओव्हर…’
INDvPAK: नाण्याचे नशीब बाबरच्या बाजूने! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण, अशी आहे प्लेईंग इलेव्हन