जसप्रीत बुमराह जुलै 2022 नंतर सोमवारी (11 सप्टेंबर) पहिल्यांदा भारताच्या वनडे जर्सीत दिसला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) पावसामुळे अपूर्ण राहिला होता. अशात सोमवारी म्हणजे राखीव दिवसी सामना खेळवला गेला. वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बुवमराहने या सामन्यात भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे मागचे जवळपास एक वर्ष दुखापतीत गेले. सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामना खेळल्यानंतर तो थेट यावर्षी ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळला. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने चार विकेट्स घेतल्या. बुमराहने आपला शेवटचा वनडे सामना मागच्या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आशिया चषक 2023 मध्ये 2 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान संघात लढत झाली. पण या सामन्यात पावसामुळे भारताला एकही षटक गोलंदाजी करता आला नाही आणि बुमराहच्या चाहत्यांचीही निराशी झाला. असे असले तरी, रविवारी अखेर बुमराह मोठ्या काळानंतर वनडे जर्सीत परतला.
बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्यातील तिसऱ्याच षटकात सलामीवीर इमाम उल हक याची विकेट घेतली. पाकिस्तानच्या डावातील हे पाचवे षटक असून षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इमाम शुबमन गिल याच्या हातात झेलबाद झाला. (IND vs PAK । Jasprit Bumrah strikes! Pakistan lost their 1st Wicket. )
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध विराटने ठोकलं 77वं आंतरराष्ट्रीय षटक, राहुलसोबत द्विशतकी भागीदारी
वेगवान विराट! वनडे इतिहासात सर्वात जलद मिळवली 13 हजारी मनसबदारी





