भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह सामन्यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा चांगलाच क्लास घेतला. भारताच्या डावावेळी समालोचन करताना शास्त्री म्हणाले की, ‘शाहीन आफ्रिदीचे इतके कौतुक करण्याची गरज नाही, तो वसीम अक्रम नाही. जर तो सभ्य गोलंदाज असेल तर त्याने योग्य बोलले पाहिजे आणि त्याचा अतिरेक करू नये.’
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 191 धावांवर गडगडला. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने 30.3 षटकांत ही धावसंख्या गाठली. या वेळी पाकिस्तानचे गोलंदाजी आक्रमण खूपच निखळल्याचे दिसले.
शास्त्रींचे मोठे विधान
सामन्यादरम्यान, जेव्हा भारतीय फलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत होते, तेव्हा रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी समालोचन करताना मोठे भाष्य केले. ते म्हणाले, “लोकं मला म्हणतात की, पाकिस्तानची गोलंदाजी खूप चांगली आहे. ती खोटी गोष्ट आहे भावा. त्यांची गोलंदाजी चांगली नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. नसीम शाह (Naseem Shah) खेळत नसेल आणि फिरकी गोलंदाजी अशी असेल, तेव्हा शाहीन शाह आफ्रिदी कोणता वसीम अक्रम (Wasim Akram) नाही. तो नवीन चेंडू टाकू शकतो, आणि विकेट घेऊ शकतो. तो चांगला गोलंदाज आहे. परंतु त्याला जास्त हवेत जाण्याची गरज नाही. जेव्हा चांगलं असेल, तेव्हा चांगलच म्हणावं. कोणाला जास्त हवेत नेण्याची गरज नाही. ही गोलंदाजी चांगली नाही हे सर्वांना मान्यच करावं लागेल.”
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाजी आक्रमण पूर्णपणे कमकुवत दिसले. पहिल्या दोन षटकांमध्येच रोहित शर्मा आणि शुबमन गिलने (Shubhman Gill) 22 धावा चोपल्या होत्या. यातील एक षटक पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे होते. आफ्रिदीने भारताविरुद्ध 6 षटकात 36 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा-
सचिन ते बुमराह, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हिरो बनलेले 6 धुरंधर, एक तर तीनदा चमकला
CWC23 Toss: दिल्लीत इंग्लंडने जिंकला टॉस, बटलरसेना करणार फिल्डिंग; अफगाणी ताफ्यात मोठा बदल