टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याने ही फेरी सुरू होईल. विश्वचषकातील आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा भारतीय संघ रविवारपासून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना दुबईच्या मैदानावर होईल. विशेष गोष्ट अशी की, भारताला दुबईत आपल्या साखळी फेरीचे ५ पैकी ४ सामने खेळायचे आहेत. तर अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव सामना अबुधाबीमध्ये होईल. गेल्या ११ वर्षांपासून युएई हे पाकिस्तानचे घरचे मैदान आहे. मात्र, अलीकडच्या काळात आयपीएलविरुद्ध खेळल्यामुळे भारतालाही इथे खूप अनुभव आला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संघांना येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना रणनीती ठरवण्यात फारशी अडचण येणार नाही. इथल्या खेळपट्टीचे रंगरुप काय आहे आणि येथील आकडेवारी काय सांगतो, यावर एक नजर टाकूया.
फिरकी की वेगवान गोलंदाजांना मदतगार खेळपट्टी
दुबई येथील काही खेळपट्ट्या संथ आहेत तर काही वेगवान गोलंदाजांना मदत करतात. गेल्या दोन आयपीएल दरम्यान, येथे सरासरी धावसंख्या १५०-१६० दरम्यान राहिली आहे. वेगवान गोलंदाज येथे अधिक यशस्वी झाले आहेत. प्रत्येक बळीसाठी वेगवान गोलंदाज येथे २७ धावा खर्च करतात. तर फिरकीपटू एका बळीसाठी ३२ धावा मोजतात. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संघ येथे ३-३ वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतात.
नाणेफेक ठरणार निर्णायक
भारत-पाकिस्तान सामन्यातील नाणेफेक अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण, हे मैदान काहीसे लहान असल्याने अनेक कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय स्वीकारतात. या मैदानावर अनेकदा धावांचा पाठलाग करणे सोपे गेले आहे. तसेच नुकतीच आयपीएल खेळल्याने कर्णधार विराट कोहलीला या मैदानांचा चांगलाच अंदाज आला असेल. त्यामुळे तो परिस्थितीनुरूप संघ निवड करेल.
पाकिस्तान विरुद्ध संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी व वरूण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या-





