भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना शनिवारी (2 सप्टेंबर) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला गेला. कर्णदार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून भारत प्रथम फलंदाजी करणार, हे निश्चित केले. असे असले तरी, रोहित संघासाठी महत्वापूर्ण धावा करू शकला नाही. पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदी याने रोहितचा त्रिफळा उडवला.
रोहित शर्मा () याने विकेट गमावली, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 15 होती. दरम्यान, रोहित भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आला, तेव्हा त्याने चांगली लय धरली होती. मात्र, पाचव्या षटकात पाऊस आल्यामुळे सामना काही काळासाठी थांबवला गेला. पण पाऊस थांबल्यानंतर रोहितची लय बिघडली आणि शाहीनने संधी साधून स्टंपवर निशाणा साधला. शाहीनने जबरदस्त इनस्विंग चेंडू टाकला, जो रोहितला खेळता आला नाही. (Shaheen Afridi gets Rohit Sharma early right after the rain break!)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची सुंदरी आहे विराटची डाय हार्ट फॅन, पोहोचली श्रीलंकेला, कोणाच्या विजयासाठी प्रार्थना?
IND vs PAK । लाईव्ह सामन्यात पावसाची एन्ट्री! रोहित लयीत असताना थांबवली गेली मॅच