---Advertisement---

सूर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य, पाकिस्तानमध्ये न जाण्याचे कारण सांगितले, पाहा VIDEO

On: मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024 11:00 AM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत व्यस्त आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून ते त्यांच्या देशात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. पण भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. भारताने यासंदर्भात आयसीसीला सांगितले आहे की ते पाकिस्तानात जाणार नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम असल्याच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. पण बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते.

मात्र, पाकिस्तानी चाहते टीम इंडियाला त्यांच्या देशात पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना भारतीय क्रिकेट संघातील सुपरस्टार खेळाडूंना त्यांच्या देशात पाहायचे आहे. असेच एक दृश्य दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळाले, जिथे एका पाकिस्तानी चाहत्याने भारतीय क्रिकेट संघाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवची भेट घेतली आणि त्याला पाकिस्तानमध्ये खेळण्याशी संबंधित प्रश्न विचारला.

भारतीय संघाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला एका पाकिस्तानी चाहत्याने एक विचित्र प्रश्न विचारला. या पाकिस्तानी चाहत्याने सूर्याला विचारले, तुम्ही लोक पाकिस्तानात का येत नाही? यावर सूर्यकुमार यादव थोडेसे हसायला लागला आणि म्हणाला की आमच्या हातात थोडीच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayat Raza Qureshi (@aayatqureshi.14)


एका युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग तसेच पाकिस्तानचा चाहता दिसत आहेत. या पाकिस्तानी चाहत्याने सूर्या आणि रिंकूसोबत फोटो काढले आणि नंतर पाकिस्तानात येण्याशी संबंधित प्रश्न विचारला, असे सांगितले जात आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 4 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे.

हेही वाचा-

IND vs AUS: हा ऑस्ट्रेलियन फलंदाज जसप्रीत बुमराहला घाबरला! मालिकेआधी मोठं वक्तव्य
अफगाणिस्तानच्या फलंदाजाची कमाल, याबाबतीत विराट कोहली सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे
पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल? या 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---