पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव याने जादू दाखवलीच. पाकिस्तानच्या डावातील 33व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीला आला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने सौद शकील याला वायचीत पकडले, तर शेवटच्या चेंडूवर इफ्तिखार अहमद याला त्रिफळाचीत केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. पाकिस्तनने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेल. संघाची धावसंख्या तीन विकेट्सच्या नुकसानावर 155 होती. पण त्यानंतर संघाची धावसंख्या 166 असताना पाकिस्तानचे एकूण 5 फलंदाज तंबूत परतले. सौद शकील () याने 6, तर इफ्तिखारने 4 धावा करून विकेट गमावली. कुलदीपने डावातील 33व्या षटकात अवघ्या चार धावा खर्च करून या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सौद शकीलच्या विकेटसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने घेतलेला डीआरएसचा निर्णय महत्वाचा ठरला.
https://www.instagram.com/reel/CyYIaBTPp2m/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/reel/CyYIrONvSZ5/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
पुढे पाकिस्ताने मोहम्मद रिझवान याच्या रुपात आपली सहावी विकेट देखील गमावली. संघाची धावसंख्या 168 असताना पाकिस्तान संघाला रिझवानच्या रुपात सहावा झटका बसला. जसप्रीत बुमराहने त्याला तंबूत धाडले. (IND vs PAK two wickets in one over for Kuldeep Yadav!)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम, मागील 7 सामन्यात ठरलेले अपयशी
माजी क्रिकेटपटूला मिळणार 91 कोटींची भरपाई, ‘टॉप गीअर’ शूटदरम्यान घडला होता भीषण अपघात