---Advertisement---

सिंग इज किंग! जोहान्सबर्गमध्ये अर्शदीपचा कहर, 10 षटकात पहिल्यांदाच केलं ‘हे’ मोठं काम

On: रविवार, डिसेंबर 17, 2023 4:16 PM
Arshdeep Singh
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका रविवारी (17 डिसेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने या सामन्यात कारकिर्दीतील पहिला 5 विकेट हॉल घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 116 धावांवर सर्वबाद झाला.

भारतीय संघाला या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. अर्शदीप सिंग याने 10 षटकांमध्ये 37 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. यात सलामीवीर रीझा हेड्रिक्स (0), टोनी डी झोर्झी (28), रासी वॅन डर ड्युसेन (0), हेन्रीच क्लासेन (6) आणि अँडिसे फेहलुक्वायो यांनी अर्शदीपच्या चेंडूवर विकेट मगावल्या. या पाच महत्वाच्या विकेट्समुळेच दक्षिण आफ्रिका संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही.

(IND vs SA 1st ODI Maiden 5-fer for Arshdeep Singh in International Cricket.)

भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका संघ-
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

महत्वाच्या  बातम्या – 
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर
INDvsSA 1st ODI: यजमानांनी जिंकला टॉस, भारताकडून ‘या’ धुरंधराचे वनडे पदार्पण; पाहा Playing XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---