दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात सेंच्यूरियन येथे सुरू असलेला बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना अतिशय रोमांचक अवस्थेत आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या भारताच्या फलंदाजांचा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. केवळ भारताचे सलामीवीर केएल राहुल (१२३) आणि मयंक अगरवाल (६० धावा) त्यांच्यापुढे तग धरून अर्धशतक करू शकले. परिणामी भारताने दक्षिण आफ्रिकेला ३२८ धावांचे लक्ष्य दिले.
प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजांनीही यजमान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगलीच परिक्षा घेतली आणि त्यांना केवळ १९६ धावांवर रोखले. या डावादरम्यान सर्वाधिक ५ विकेट्स घेत (5 Wickets Haul) मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने मोठे विक्रम केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावादरम्यान किगन पीटरसन शमीचा पहिला विकेट ठरला. त्याने १५ धावांवर त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऍडम मार्करम (१३ धावा), टेम्बा बावुमा (५२ धावा), वियान मडलर (१२ धावा) आणि कागिसो रबाडा हे त्याच्या जाळ्यात अकडले. १६ षटके गोलंदाजी करताना केवळ ४४ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. यासह शमीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २०० विकेट्स पूर्ण (Mohammad Shami 200 Test Wickets) केल्या आहेत. केवळ ५५ व्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे.
तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज
यासह शमी ५५ कसोटी सामन्यांमध्ये २०० विकेट्सचा आकडा गाठणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी महान अष्टपैलू कपिल देव यांनी ५० कसोटी सामन्यांमध्ये २०० विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जवागल श्रीनाथ यांनी ५४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. शमीनंतर झहीर खान आणि ईशांत ६३ कसोटी सामन्यांमध्ये २०० विकेट्स घेत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत.
मोठ्या विक्रमात पोहोचला अव्वलस्थानी
याबरोबरच शमीने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो सर्वात कमी चेंडूंमध्ये २०० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने फक्त ९८९६ चेंडूंमध्ये विकेट्सचे द्विशतक केले आहे. याबाबतीत त्याने फिरकीपटू आर अश्विन (१९२४८ चेंडू), कपिल देव (११०६६ चेंडू) आणि रविंद्र जडेजा (११९८९ चेंडू) यांना मागे सोडले आहे.
Milestone Alert 🚨 – 200 Test wickets for @MdShami11 👏👏#SAvIND pic.twitter.com/YXyZlNRkQ1
— BCCI (@BCCI) December 28, 2021
एस श्रीसंतची बरोबरी
तसेच ३१ वर्षीय शमीने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये एस श्रीसंतची बरोबरी केली आहे. या ५ विकेट्ससह त्याच्या दक्षिण आफ्रिकेत ३५ आंतरराष्ट्रीय विकेट्स झाल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
७६ – जवागल श्रीनाथ
७४ – अनिल कुंबळे
६३ – झहीर खान
५२ – हरभजन सिंग
३५ – एस श्रीसंत
३५ – मोहम्मद शमी*
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी
सुट्टीचा आनंद घेत शार्दुल-अश्विनने खोलली मजेदार प्रसंगांची पोतडी; पाहा व्हिडिओ
बिग बॅशचे मैदान गाजवणारा बेन मॅकडरमॉट आहे तरी कोण? घ्या जाणून