---Advertisement---

‘भारतीय संघाला जिंकायचे असल्यास पहिल्यांदा करावा लागेल ‘हा’ मोठा बदल’, जहीर खानने दिला मोलाचा सल्ला

Zaheer-Khan-Rahul-Dravid
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशातील पाच टी२० सामन्यांची मालिका खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील पहिले दोन्ही सामने संघाने गमावले आहेत. पाहुणा संघ या मालिकेत २-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती, पण तरीदेखील संघाला पराभव मिळाला. त्यानंतर रविवारी (१२ जून) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात देखील संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अशातच माजी वेगवान गोलंदाज जहीर खानला असे मत व्यक्त केले की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आता खेळाडूंसोबत कडक वागले पाहिजे.

जहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, “जेव्हा क्लासेन आणि बावुमा यांच्यात ती भागीदारी बनत होती, तेव्हा आपल्याला असे जाणवत होते की, भारतीय संघ आता इथून खालच्या दिशेला चालला आहे आणि संघ सामन्यात पुनरागमन करू शकणार नाही. मैदानात दे दिसत होते. ह्या त्या गोष्टी आहेत, ज्यावर राहुल द्रविड आणि त्यांच्या संघाला लक्ष द्यावे लागणार आहे. या गोष्टी जेवढ्या लवकर होतील, तेवढ्या लवकर मार्गी लावल्या पाहिजेच, कारण तिसरा सामना एका दिवसावर आला आहे. त्यांना एकत्र येऊन चर्चा करावी लागेल. त्यांना यावर देखील लक्ष्य द्यावे लागेल की, ४० षटकांच्या सामन्यात लढण्यासाठी काय करावे लागेल.”

“पहिल्या सामन्यात देखील असे वाटत होते की, भारतीय संघ पुढे चालला आहे. रविवारीही तसेच वाटत होते. नंतर संघाला गोलंदाजीत आदर्श सुरुवात मिळाली होती. भुवनेश्वर कुमारने कमाल प्रदर्शन केले, पण त्याला सामन्याचा शेवट त्या पद्धतीने करता आला नाही. ही मालिका पुढे जात असताना काही चिंतेच्या बाबी समोर येत आहेत, सोबतच दबाव देखील वाढत आहे,” असे जहीर पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, उभय संघातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मोठे लक्ष्य उभे करता आले नव्हते. पण प्रत्युत्तरात जेव्हा संघ गोलंदाजीसाठी आला, तेव्हा मात्र भुवनेश्वरने नेत्रदीपक कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये टाकेलल्या तीन षटकांमध्ये भुवनेश्वरने तीन महत्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या. ज्यामुळे आफ्रिकी संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. असे असले तरी मध्यक्रमातील एन्रिच क्लासेन मात्र लवकर बाद झाला नाही आणि त्यांने आफ्रिकी संघाला विजय मिळवून दिला. आता उभय संघातील तिसरा टी२० सामना १४ जून रोजी खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा

ऋतुराजला संघात पुन्हा स्थान मिळणे कठीण!, ‘ही’ आहेत त्याची प्रमुख कारणे

कर्णधार पंतसह संघातील ‘या’ चार खेळाडूंनी केलंय निराश, पाहा कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---