भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी रांचीमध्ये खेळला जात आहे. रोहित शर्मा आणि वरिष्ठ खेळाडूंचा भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिखर धवन कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू शाहबाज अहमद याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे, पण भारतीय संघासाठी त्याला रविवारी (9 ऑक्टोबर) पहिल्यांदाज खेळण्याची संधी मिळाली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्वतःचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अहमदने यापूर्वी बंगाल संघासाठी देशांतरगत क्रिकेटमध्ये 19 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1103 धावा केल्या आणि यादरम्यान 62 विकेट्स देखील घेतल्या.
???? A moment to cherish for Shahbaz Ahmed as he makes his debut in international cricket. ???? ????
Go well! ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/Jn9uU5fYXc
— BCCI (@BCCI) October 9, 2022
लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावापुढे 27 सामन्यांची नोंद आहे. या सामन्यांमध्ये पंतने 662 धावा केल्या आणि 24 विकेट्सही घेतल्या. देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 56 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 512 धावा केल्या, तर 39 विकेट्सही घेतल्या. आयपीएलमध्ये अहमद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघासाठी खेळतो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 29 सामन्यांमध्ये 279 धावा केल्या, तर गोलंदाजाच्या रूपात 13 विकेट्सही घेतल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील एकदिवसीय सामन्यात देखील अहमदने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
दुसऱ्या एखदिवसीय सामन्यासाठी निवडलेले दोन्ही संघ –
दक्षिण अफ्रीका: यानेमन मलान, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेविड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज (कर्णधार), ब्योर्न फोर्च्यून, कगिसो रबाडा, एनरिच नोर्त्जे.
भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ






