---Advertisement---

दुसऱ्या टी-20त भारताकडे इतिहास रचण्याची संधी; कधी जमला नाही, तो पराक्रम करणार रोहित आणि कंपनी

On: रविवार, ऑक्टोबर 2, 2022 12:34 PM
Team india
---Advertisement---

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला रविवारी (2 ऑक्टोबर) दुसरा टी-20 सामना खेळायचा आहे. यजमान भारतीय संघ या सामन्यात इतिहास घडवू शकतो. संघाकडे अशी कामगिरी करण्याची संधी आहे, जी त्यांनी यापूर्वी कधीही केलेली नाहीये. रविवारचा हा सामना गुवाहाटीच्या बारासापारा क्रिकेट स्टेडियवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर आफ्रिकी संघाचा एक खास विक्रम मोडीत निघेल. 

भारतीय संघाने मायदेशात खेळलेल्या टी-20 मालिकांमध्ये आफ्रिकी संघाला अद्याप एकदाही पराभूत केले नाहीये. अशात रविवारी बारासापारा स्टेडियवर जर भारताेने विजय मिळवला, तर संघ पहिल्यांदाच ही कामगिरी करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. मालिकेत भारत सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. अशात जर त्यांनी पुढचा सामना जिंकला, तर संघ 2-0 अशी विजयी आघाडी घेईल. भारतासाठी हा विजय ऐतिहासिक असेल.

2015 मध्ये खेळली गेलेली पहिली मालिका – 
दक्षिण आफ्रिका संघाने 2015 मध्ये पहिल्यांदा भारतात येऊन टी-20 मालिका खेळली होती. या मालिकेत पाहुण्या संघाने यजमान भारताला 2-0 अशी धूळ चारली होती. त्यानंतर आफ्रिकी संघाने 2019 आणि 2022 मध्ये भारताता पुन्हा टी-20 मालिका खेळली आणि या दोन्ही मालिका बरोबरीवर सुटल्या होत्या. 2019 मधील दोन सामन्यांच्या मालिकेचा निकाल 1-1 अशा राहिला होता. तर यावर्षीच्या सुरुवातील खेळल्या गेलेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशा बरोबरीवर सुटली. या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द केला गेला होता.

मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताची आकडेवारी निराशाजनक –
भारतीय संघाची मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 आकडेवारी समाधानकारक राहिली नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये यादरम्यान एकूण 10 टी-20 सामने खेळले गेले. या सामन्यांपैकी 5 सामने पाहुण्या आफ्रिकी संघाने, तर 4 सामने भारताने जिंकले होते. दुसरीकडे एकंदरीत टी-20 आकडेवारीचा विचार केला, तर भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दबदबा राहिला आहे. भारतीय संघाने एकूण खेळळेल्या 21 सामन्यांपैकी 12 सामन्यात आफ्रिकी संघाला पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---