मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा शारीरिक तंदुरुस्तीमुळे संघाचा भाग नाहीये. अर्शदीपला पाठीची समस्या आहे, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा टी20 सामना खेळू शकत नाहीये. त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाला एक दिवसापूर्वीच मोठा धक्का बसला होता. कारण, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा आगामी टी20 विश्वचषकातून अधिकृतरीत्या बाहेर पडला आहे. बुमराहचे संघातून बाहेर जाणे भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. अशात अर्शदीपला पाठीचा त्रास झाल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. तरीही कर्णधार रोहित शर्मा याचा असा विश्वास आहे की, अर्शदीपची समस्या गंभीर नाहीये.
पहिल्या टी20 सामन्यात ‘सामनावीर’
अर्शदीप सिंग याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपल्या प्रदर्शनाने प्रभावित केले आहे. पहिल्या टी20 सामन्यात अर्शदीप याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा दिल्या होत्या. पहिला सामना भारतीय संघाने 8 विकेट्सने खिशात घातला होता.
दुसऱ्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स
अर्शदीप सिंग याने दुसऱ्या सामन्यातही आपल्या गोलंदाजीची जादू कायम ठेवली. त्याने सर्वाधिक 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र, या सामन्यात त्याने सर्वाधिक धावा खर्च केल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 62 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यात भारतीय फलंदाज चांगलेच चमकले होते. केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला होता. या चारही फलंदाजांनी 40हून अधिक धावा चोपल्या होत्या.
आता तिसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंग सिंग संघातून बाहेर आहे. अशात, भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी फळी कशी कामगिरी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी20 सामन्यानंतर राहुलने शेअर केला खास व्हिडिओ, होणाऱ्या सासरेबुवांच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
विराटलाही मराठी जमतंय की राव! सूर्यकुमारच्या पोस्टवरील ‘रनमशीन’ कोहलीची ‘ती’ कमेंट वेधतेय लक्ष