भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ मंगळवारी (१४ जून) रात्री सात वाजता आमने सामने असतील. उभय संघातील टी-२० मालिकाचा हा तिसरा सामना आहे, जो विशाखापटनममध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. अशात तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचे बदल केले जाऊ शकतात. भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जहीर खानने याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने जेव्हा भारतीय संघाचा घोषणा केली, तेव्हा त्यामध्ये उमरान मलिक (Umran Malin) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या युवा गोलंदाजांना संधी दिली गेली होती. उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते, याच कारणास्तव चाहते त्याला भारताच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. जहीर खान (Zaheer Khan) यालाही असेच वाटते की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात उमरानला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.
उमरानला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याविषयी जहीरने महत्वाची प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना जहीर म्हणाला की, “पुढच्या सामन्यात उमरानला संधी मिळाली पाहिजे. तो वेगवान चेंडू टाकतो, ज्यामुळे नक्कीच फरक पडतो. आपण आयपीएलमध्ये पाहिले आहे की, उमरानने विकेट्स घेतल्या आहेत. नक्कीच धावा खर्च होतील, पण तुमच्याकडे असे ‘एक्स फॅक्टर’ असले पाहिजेत. आयपीएलमध्ये उमरानने त्याच्या वेगवान चेंडूच्या जोरावर (डेविड) मिलरसारख्या फलंदाजांना बाद केले होते. सध्या आफ्रिकी फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मिलर असो किंवा क्लासेन सर्वजण अप्रतिम खेळत आहेत. उमरान संघात असल्यावर त्यांच्यावर देखील दबाव बनेल.”
दरम्यान, उभय संघातील या मालिकेचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या सामन्यात भारताने विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य आफ्रिकी संघाने १९.१ षटकात आणि ७ विकेट्स राखून गाठले. दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघ अवघ्या १४८ धावा करू शकला होता. हे लक्ष्य आफ्रिकी संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.२ षटकात गाढले. मालिकेतील हा तिसरा सामना भारताला मालिकेत टिकून राहण्यासाठी जिंकावा लागणार आहे. हा भारत या सामन्यात पराभूत झाला, तर आफ्रिकी संघ मालिका नावावर करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या नावावर असणारे लाजिरवाणे विक्रम; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नको रे बाबा!’
तिसऱ्या टी२० सामन्यात कोण ठरणार वरचढ, वाचा काय सांगतोय मैदानाचा इतिहास
तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियावर येणार ‘ती’ नकोशी वेळ?, दक्षिण आफ्रिका ठरणार का कारण