भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) खेळला जाईल. भारताने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाहुण्या आफ्रिकी संघाला पराभूत केल्यामुळे मालिका आधीच नावावर केली आहे. परंतु आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी संघ हा शेवटचा सामना जिंकण्याच्याच प्रयत्नात असेल. उभय संघातील हा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. चला तर जाणून घेऊया खेळाडूंना खेळण्यासाठी या सामन्यात वातावरण कसे असेल.
उभय संघातील दुसरा टी-20 सामना गुवाहीटीच्या बारासापारा स्टेडियमवर खेळला गेला होता, जो भारताने 16 धावांनी जिंकला. तर तिरुवानंतरपुरममध्ये खेळला गेलेला पहिला सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. दरम्यान ही पहिलीच वेळा आहे, जेव्हा भारताने मायदेशात दक्षिण आप्रिकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारतात एकही टी-20 मालिका गमावली नव्हती.
हवामान अदाजानुसार मंगळवारी इंदोरमध्ये वातावरण कही प्रमाणात ढगाळ असेल. अशात होळकर स्टेडियमवर काही अंशी दव पडण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. खेळपट्टीवर दव पडल्यानंतर सामन्यावर त्याचा नक्कीच परिणाम होईल. आकाशात ढग जरी जमा झाले, तरी पावसाची शक्यता खूपच कमी सांगितली गेली आहे. अशात पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता नगण्य असेल.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार नाहीये. विराट आशिया चषक 2022 नंतर त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. अशात संघ त्याच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याला आफ्रिकी संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली आहे. गुवाहाटीमध्ये विजय मिळवल्यानंतर विराट सोमवारी (3 सप्टेंबर) मुंबईसाठी रवाना झाला. तसेच सलामीवीर फलंदाज केएल रहुल देखील मालिकेती हा तिसरा सामना खेळणार नाहीये. आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, शिमरन हेटमायरला दाखवला विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता
धक्कादायक! इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये दिले गेले निकृष्ट दर्जाचे अन्न; कर्णधार मोईन अलीचा खुलास