भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात शुक्रवारी (१७ जुन) चौथा टी२० सामना खेळला जाणार आहे. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे सायंकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. पाच सामन्याच्या या टी२० मालिकेत पाहुणा संघ २-१ने पुढे आहे. ही मालिका बरोबरीत राखण्याच्या प्रयत्न यजमान संघ करणार आहे. भारतीय संघ आधीच सलग दोन सामन्यात पराभूत झाल्याने त्यांच्यासाठी चौथा सामना कोणत्याही स्थितीत जिंकणे आवश्यक आहे. यातच भारतीय संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) दुखापतीतून सुधारला असून त्याच्या तंदुरूस्तीवर नजर असणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून डी कॉकच्या दुखापतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त दिले आहे.
सीएसएने ट्वीट मध्ये म्हटले,”यष्टीरक्षण-फलंदाज क्विंडन डी कॉकच्या हाताची दुखापत सुधारली आहे. मेडिकल स्टाफच्या रिपोर्टनुसार तो चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.”
Wicket-keeper batsman, Quinton de Kock, has made a marked improvement in his recovery from a wrist injury. The Proteas’ medical staff will continue to assess his progress and make a decision on his availability for match four in due course.#BePartOfIt
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 15, 2022
मेडिकल रिपोर्टमध्ये डी कॉक तंदुरूस्त असला तर तो चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. हाताच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यास मुकावे लागले होते. तो चौथ्या सामन्यात खेळला तर भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग सात सामन्यात भारताचा पराभव केला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाज आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात उत्तम कामगिरी करत पराभवाची मालिका खंडीत केली आहे. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकत मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.
भारतीय संघ या मालिकेत रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यामध्ये सलामीवीर इशान किशनने दिल्ली येथे झालेल्या पहिल्याच टी२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याला आयपीएल २०२२मध्ये फलंदाजीत लय सापडत नव्हती. या मालिकेत त्याने जोरदार कामगिरी करत टिकाकरांचे तोंड बंद केले आहे. त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतके करत ५४.६७च्या सरासरीने १६४ धावा केल्या आहेत.
मागील सामन्यातील कामगिरी करत भारताचे या सामन्यात जिंकण्याचे आणि मालिका बरोबरीत आणण्याचे प्रयत्न असणार आहे. टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम खेळत आहे. ते मालिका जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
दुसरा चेतेश्वर पुजाराचं म्हणावे! मुंबईच्या सलामीवीराने तब्बल ५४ चेंडू खेळल्यानंतर काढली पहिली धाव
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण