सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. मायदेशात सुरू असेलेल्या या टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने आफ्रिकी संघाने तरे एक सामना भारताने जिंकला. उभय संघातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील काही कमजोर दुवे या मालिकेदरम्यान उघड झाले. मालिकेतील चौथा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे, जो जिंकण्यासाठी दोन्ही संघांना या कमजोर दुव्यांवर लक्ष द्यावे लागेल.
मधल्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकी संघाचे चांगले प्रदर्शन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या तीन टी२० सामन्यांमध्ये आफ्रिकी गोलदाजांनी ११ ते १६ या षटकांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. या षटकांमध्ये भारताने फक्त ७.७२ च्या इकोनॉमीने धावा केल्या. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी मात्र ११ ते १६ या षटकांमध्ये ११ च्या इकोनॉमी रेटने धावा केल्या. भारतीय संघाने या षटकांमध्ये आफ्रिकी संघाच्या तुलनेत विकेट्स देखील जास्त गमावल्या. ११ ते १६ षटकांदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या ३ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या, तर भारताच्या ६ खेळाडूंनी यादरम्यान विकेट्स गमावल्या. पहिल्या टी२० सामन्यात मधल्या षटकांतील खराब प्रदर्शनामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस प्रदर्शन
मधल्या षटकात भारतीय संघ कमजोर ठरला असला, तरी पॉवरप्लेमध्ये मात्र भारतीय फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकी फलंदाज झगडताना दिसेल. तीन सामन्यांमधील पॉवरप्लेच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने ६ विकेट्स गमावल्या, तर ७.११ च्या इकोनॉमीने धावा केल्या. दुसरीकडे भारताने मात्र तिन्ही सामन्यांतील पॉवरप्लेच्या षटकांमध्ये फक्त एक विकेट गमावली आहे. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी ८.३३ च्या इकोनॉनी रेटने धावा केल्या, ज्या आफ्रिकी संघाच्या तुलनेत चांगल्या आहेत.
भारताला चांगली सुरुवात आणि मध्यल्या षटकांमध्ये चांगल्या प्रदर्शनाची गरज
विशाखापटनममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या भारताच्या सलामीवीर जोडीने पॉवरप्लेच्या ६ षटकात ५७ धावा चोपल्या. या सामन्यात पहिल्या १० षटकांमध्ये भारताची धावसंख्या ९७ होती. तर दिल्लीमध्ये खेलल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये सलामीवीर जोडीने भारतीय संघाला ५१ धावा करून दिल्या होत्या. सुरुवातीच्या षटकांमध्ये जर संघाला चांगली सुरुवात मिळाली, तर संघाची धावसंख्या देखील मोठी होते. पहिल्या सामन्यात भारताने २१२, तर तिसऱ्या सामन्यात १७९ धावा केल्या होत्या. अशाच प्रकारे चौथ्या सामन्यात देखील संघाला चांगली सुरुवात मिळाली आणि मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करून संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला, तर आफ्रिकी संघाच्या अडचणी नक्कीच वाढतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA | चौथ्या टी२० सामन्यात ‘या’ ६ खेळाडूंवर असेल विशेष जबाबदारी
कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित
कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित