भारत विरुद्ध दक्षिण (INDvsSA) आफ्रिका चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोट येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत पाहुणा संघ २-१ असा सरस आहे. या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असून तिसरा सामना जिंकत या मालिकेतील पहिला विजय मिळवला आहे. या तिन्ही सामन्यात भारताचे उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे युवा खेळाडू बाकावर बसून आहेत. त्यांना संधी कधी देणार याबाबत आजी-माजी क्रिकेटपटूंची चर्चा सुरूच आहे. त्यातच एका दिग्गजाने त्यांच्या निवडीबाबत मोठे विधान केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने जेव्हा भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा त्यामध्ये उमरान मलिक (Umran Malin) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या युवा गोलंदाजांना संधी दिली गेली होती. उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते, याच कारणास्तव चाहते त्याला भारताच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते, मात्र भारताने तिन्ही सामन्यांमध्ये अंतिम खेळाडूमध्ये कोणताच बदल केला नव्हता.
आकाश चोप्राने त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवर म्हटले, “आवेश खान (Avesh Khan) याला या मालिकेत एकही विकेट मिळाली नाही. त्याच्याजागी अंतिम अकरामध्ये बदल दिसेल. तर यावेळी अर्शदीप की उमरान कोणाला संधी देण्यात येईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. भारतीय संघामध्ये कोणताही बदल नाही केला तरी काही फरक पडणार नाही.”
अर्शदिपकडे मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांना त्रास देण्याची क्षमता आहे. या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकामध्ये चांगलाच मार खाल्ला आहे. अर्शदिपला चौथ्या सामन्यात संघात घेतले तर गोलंदाजी अधिक आक्रमक बनेल. उमरानला संघात घेतले तर त्याच्या वेगाचा संघाला फायदा होऊ शकतो.
दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्यात आतुर आहेत. भारत सामना बरोबरीत आणि दक्षिण आफ्रिका मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. खालील खेळाडूंमधून अंतिम अकराचा संघ निवडला जाईल.
भारतीय संघ: रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण अफ्रीकी संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिजा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन (यष्टीरक्षक), केशव महाराज, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रीक नॉर्किया, वायने पर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या सामन्यात भारताला ‘या’ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, वाचा काय आहेत संघातील कमतरता
IND vs SA | चौथ्या टी२० सामन्यात ‘या’ ६ खेळाडूंवर असेल विशेष जबाबदारी