रविवार, 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. भारताने या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारला असला, तरी सामन्याची मजा मात्र सर्वांनी घेतली. सामना निकाली निघण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा मध्यक्रमातील फलंदाज डेविड मिलर मॅच विनर ठरला. मिरलने नाबाद 59 धावांची वादळी खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिका संघ भारताविरुद्धचा हा सामना जिंकल्यानंतर सुपर 12 फेरीतील ग्रुप दोनमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, ज्यासाठी एक गुण मिळाला. त्यानंतर संघाने पाकिस्तान आणि आता भारत या दोन्ही बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारली आहे. भारताविरुद्धचा सामन्या सामन्यात आफ्रिकी संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. पण भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. भारत या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 133 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने देखील सुरुवातीच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. पण डेविड मिलर (David Millar) खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने संघाला विजय देखील मिळवून दिला. मिलरने या सामन्यात एकूण 46 चेंडू खेळले, ज्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा कुटल्या. आफ्रिकी संघाने त्यांना मिळालेले 134 धावांचे लक्ष्य 5 विकेट्सच्या नुकसानावर आणि 19.4 षटकामध्ये गाठले. मागच्या एका वर्षात मिलरचे टी-20 क्रिकेटमधील प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे.
यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये डेविड मिलरने टी-20 फॉरमॅटमध्ये एकूम 16 वेळा फलंदाजी केली आहे. यापैकी 14 वेळा तो नाबाद राहिला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 154 चा होता. तर सरासरी तब्बल 280.50 ची राहिली आहे. मिलरने भारताविरुद्ध खेळताना मारलेल्या तीन षटकांरांच्या जोरावर अजून एक महत्वाचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंजर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये कायरन पोलार्ड पहिल्या क्रमांकावर होता. आता मिलर देखील या यादी पोलार्डच्या परोबीला पोहोचला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन आहे.
एका कॅलेंडर वर्षात भारताविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (टी-20 क्रिकेट)
20 – डेविड मिलर (2022)*
20 – कायरन पोलार्ड (2019)
15 – निकोलस पूरन (2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपला ‘ती’ विकेट मिळताच नाचू लागले भारतीय खेळाडू, हार्दिक पंड्याची रिएक्शन एकदा पाहाच
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी