विराट कोहली (viart kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. भारतीय संघाला या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघातील कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून होणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी याबाबतीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या सामन्यासाठी खेळाडूंचे उत्तम पर्याय सुचवले आहेत. ते म्हणाले की, ” या संघात चार खेळाडू असे आहे, जे निश्चितपणे बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळतील. मला वाटते की, जर शार्दुल ठाकूर पाचव्या गोलंदाजाच्या रूपात सहभागी झाला तर, तो सर्वात उत्तम पर्याय आहे. कारण, तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक स्थिर पर्याय आहे. आपल्याकडे रविचंद्रन अश्विन देखील आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज फिट असल्याची पुष्टी झाली आहे, तर हे सर्व चार गोलंदाजांचे खेळणे पक्के आहे. मोहम्मद सिराज सध्या ज्याप्रकारे खेळत आहे, मला नाही वाटत की, त्याच्या आधी इशांतर शर्माला संधी मिळेल.”
दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या कालखंडापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेले नाही. यादरम्यान या दोघांनी अनेकदा चाहत्यांची निराशा केली आहे. अशात आगामी मालिकेत श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी अजिंक्य-पुजारा या दिग्गजांच्या जोडीला कडवे आव्हान देतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे गोलंदाजांच्या निवडीसंदर्भातही अजून संभ्रम कायम आहे. निवड सिमतीच्या माजी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघ या मालिकेत वेगवान गोलंदाजांसोबत उतरण्याची शक्यता आहे. शमी आणि बुमराह संघात पुनरागमन करतीय याची पूर्ण शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
व्हिडिओ पाहा –