भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. विराटने मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकही शतक केले नाहीय आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ मध्येही त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. अशात अनेकजणांनी विराटला काही काळासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. माध्यमांमध्येही याविषयी अनेक वृत्त पाहायला मिळत आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत त्याला विश्रांती दिली जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
विराटने त्याचे शेवटचे शतक २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात केले होते. तेव्हापासून आजपर्यंत चाहते त्याच्या शतकाचा प्रतिक्षा करत आहेत. आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या ११ सामन्यात त्याने २१.६० च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ११.९२ चा राहिला आहे आणि केवळ एक अर्धशतक केले आहे. विराटने यावर्षी तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याची सरासरी ३७.८० राहिली आहे. या पाच डावांमध्ये त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने १८९ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने यावर्षी २३.६६ च्या सरासरीने १४२ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० मध्ये ३४.५० च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माध्यमांतील वृत्तानुसार विराट कोहली आगामी दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. या काळात विराट विश्रांती घेऊ शकतो. जर असे झाले, तर तो जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. विश्रांती घेण्यासाठी विराटला जवळपास एक महिन्याचा वेळ मिळेल आणि तो यादरम्यान स्वतःला मानसिक दृष्ट्या मजबूत बनवू शकतो.
विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सोडली असली, तरी त्याच्या फॉर्ममध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाहीये. मागच्या जवळपास सहा वर्षांपासून विराट विश्रांती न घेता सतत संघासोबत खेळत आला आहे. या सर्व गोष्टींचा दबाव मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्याच्यावर आहे आणि विश्रांतीनंतर तो कमी होण्याची शक्यता नक्कीच आहे.
निवडकर्त्यांच्या मते ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा एखादा खेळाडू अशा फॉर्ममधून जात आहे. ही गोष्ट स्वाभाविक आहे. विराटने विश्रांती घेतल्यानंतर निवडकर्ते त्याच्यासोबत, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा करून कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, याचा निर्णय घेतील
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास
मुंबई इंडियन्समध्ये नव्याने एंट्री केलेला ट्रिस्टन स्टब्स आहे तरी कोण? जाणून घ्या त्याची कामगिरी