भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (India Tour Of South Africa) तयारीत व्यस्त आहे. २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकांसाठी १६ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला उड्डाण भरणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यातून मोठी बातमी येते आहे.
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार (Indian Test Team Vice Captain) आणि वनडे संघाचा नवनियुक्त कर्णधार (Indian ODI Team New Captain) रोहित शर्मा (Rohit Sharma) याला दुखापत झाली आहे. मुंबईत सुरू असलेल्या सराव सत्रादरम्यान तो दुखापतग्रस्त (Injured During Mumbai Practice Session) झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबई (Mumbai) येथे एकत्र जमून सराव करत आहेत. या सराव सत्रादरम्यान रोहितच्या हाताला जखम झाली (Rohit Sharma Injured) आहे. तो थ्रो डाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्र यांच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव करत असताना, चेंडू त्याच्या हातावर लागला. यामुळे त्याला प्रचंड वेदनाही झाल्या आहे. मात्र त्याची ही दुखापत सौम्य आहे की गंभीर, याबाबत अद्याप कसलेही अपडेत मिळालेले नाही.
रोहितपूर्वी २०१६ मध्ये अजिंक्य रहाणेलाही अशीच दुखापत झाली होती. ज्यामध्ये सरावादरम्यान थ्रो डाऊनवर फलंदाजी करत असताना त्याच्या हाताच्या करंगळीला चेंडू लागल्याने तो जखमी झाला होता.
रोहितकडे तंदुरुस्त होण्यासाठी अजून २ आठवड्यांचा कालावधी
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी अजून २ आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे रोहितची दुखापत जर जास्त गंभीर नसेल, तर तो या सामन्यापूर्वी फिट होऊ शकतो. परंतु जर तो दुखापतीमुळे या सामन्याला मुकला तर सेंच्यूरियनमधील पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करताना दिसतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
‘एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि…’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विराटचा जुन्या आठवणींना उजाळा
आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी