---Advertisement---

वयाच्या २३व्या वर्षी अर्धशतकवीर इशान किशनच्या नावे मोठी कामगिरी; रैना, रोहित आणि विराटशी बरोबरी

Ishan-Kishan
---Advertisement---

मंगळवारी (१४ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने पहिला विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ जिंकला होता, पण तिसऱ्या सामन्यात इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीमुळे भारताचा विजय सोपा झाला. दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. २३ वर्षीय इशानने या सामन्यातील प्रदर्शनानंतर खास विक्रमाची नोंद स्वतःच्या नावापूढे केली आहे.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली आणि भारताला एक चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराजने ३५ चेंडूत ५७, तर इशानने ३५ चेंडूत ५४ धावा केल्या. इशानने अवघ्या ३१ चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट १५४.२९ होता.

ही चौथी वेळ आहे, जेव्हा इशानने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचे वय सध्या फक्त २३ वर्ष आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात इशानच्या आधी असे फक्त तीन खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी २३ व्या वर्षापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ४ वेळा ५० पेक्षा मोठी खेळी केली होती. हे तीन दिग्गज दुसरे कोणी नसून रोहित शर्मा, सुरेश रैना आणि विराट कोहली आहेत. आता या दिग्गजांच्या यादीत इशानच्या रूपात नवीन खेळाडू सहभागी झाला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या टी-२० सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादीत २० षटकांमध्ये संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकी संघ १९.१ षटकात आणि १३१ धावा करून सर्वबाद झाला. सामन्यातील पराभवानंतर देखील दक्षिण आफ्रिका या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. उभय संघातील चौथा टी-२० सामना १७ जून रोजी राजकोटमध्ये आयोजित केला गेला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

चल हवा येऊ दे! रूडचा मूड ऑफ करत नदालने पुन्हा दाखवून दिले, ‘आपणच आहोत लाल मातीचे बादशाह’

कसोटी खेळतोय की टी२०!, इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने केवळ ‘इतक्या’ चेंडून शतक ठोकत रचलाय विक्रम

राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---