भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. विश्वचषकापूर्वी हा भारताचा शेवटचा टी20 सामना असणार आहे. पहिल्या दोन सामन्यात विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या केएल राहुल हा मात्र या सामन्यात खेळताना दिसणार नाहीये. त्याला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशातच राहुलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओत दुसऱ्या टी20 सामन्या आधीच्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
केएल राहुलचा व्हिडिओ
धडाकेबाज फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राहुलने याला केलॉग असे नाव दिले आहे. व्हिडिओत अनेक लहान- लहान क्लिप्सचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला तो हॉटेलमध्ये एन्ट्री करत आहे. त्यासोबतच त्याने विमानतळ आणि विमान प्रवास करतानाच्याही क्लिप्सचा समावेश केला आहे. तो नेट्समध्ये स्ट्रेचिंग आणि फलंदाजीवेळी जबरदस्त फटकेबाजी करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CjPpQ22AsoT/?utm_source=ig_embed&ig_rid=60a48b06-d548-4a1c-a98d-95fbaac0dc0b
राहुलने हा व्हिडिओ पोस्ट करताच चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिचे वडील आणि दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यानेही कमेंट केली आहे. सुनीलने कमेंटमध्ये एका हार्ट इमोजीसह हात वर उचलत जल्लोष करणारे इमोजी शेअर केले आहेत.
भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. अशात तिसऱ्या टी20 सामन्यात राहुलसोबतच विराट कोहली (Virat Kohli) यालाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अपेक्षा केली जात आहे की, राहुलच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) याला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
खरं तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. त्याने 28 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली होती. तसेच, पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. या मालिकेपूर्वी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, दुसऱ्या टी20त त्याचा स्ट्राईक रेट 203 पेक्षाही अधिक करत त्याने टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतीय संघ 3-0ने जिंकतो की, तिसरा सामना पाहुण्या संघाच्या नावावर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटलाही मराठी जमतंय की राव! सूर्यकुमारच्या पोस्टवरील ‘रनमशीन’ कोहलीची ‘ती’ कमेंट वेधतेय लक्ष
तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन