टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव करत मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीयांचे वर्चस्व होते. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीने फलंदाजीत कहर केला. तर वरुण चक्रवर्तीसह अर्शदीप सिंग गोलंदाजीत चमकले. जर आपण टॉप-5 खेळाडूंबद्दल बोललो, तर फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू होते. तर यजमान संघाचा फक्त एक खेळाडू गोलंदाजीत आपले स्थान निर्माण करू शकला. या टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर टाकूयात.
सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेत, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली. या दोन्ही फलंदाजांनी या मालिकेत 200 धावांचा टप्पा पार केला. त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करण्यात यश आले नाही. मालिकेतील पहिले शतक झळकावल्यानंतर सॅमसन पुढच्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. तर तिलक वर्माने शतक झळकावण्यापूर्वी शेवटच्या दोन सामन्यांमध्ये 33 आणि 20 धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे, तिलक या मालिकेत सर्वाधिक 280 धावा करणारा फलंदाज ठरला. तर संजू सॅमसनने 216 धावा केल्या.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसेन आणि अभिषेक शर्मा हे टॉप-5 मध्ये होते.
सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत भारतीयांचे वर्चस्व आहे. या 5 खेळाडूंपैकी चार भारतीय आहेत. वरुण चक्रवर्ती या मालिकेत सर्वाधिक 12 बळी घेऊन अव्वल स्थानावर आहे. त्याच्याशिवाय एकाही गोलंदाजाला 10 बळींचा टप्पा ओलांडता आला नाही. अर्शदीप 8 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर राहिला. याशिवाय रवी बिश्नोई, जेराल्ड कोएत्झी आणि अक्षर पटेल यांच्या नावांचाही या यादीत समावेश आहे.
हेही वाचा-
शर्मा कुटुंबीयात छोट्या ‘हिटमॅन’चे आगमन, रोहित बनला दुसऱ्यांदा ‘बाबा’
संजू सॅमसन, तिलक वर्माचे झंझावाती शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे उभारला 283 धावांचा डोंगर
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेचा दारुण पराभव, मालिका 3-1 ने खिश्यात