भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर आमने सामने येतील. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी विजयी पताका फडकवत सूर्या ब्रिगेड मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मालिका अनिर्णित ठेवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. सामन्यापूर्वी पाहुयात जोहान्सबर्गच्या खेळपट्टीचा फायदा कोणाला होईल. फलंदाजांना की गोलंदाजांना?
वँडरर्स स्टेडियमची खेळपट्टी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. हे उच्च धावसंख्येचे स्टेडियम आहे. जेथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 174 आहे. जोहान्सबर्गमध्ये आतापर्यंत 33 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात सर्वोच्च संघाची एकूण धावसंख्या 260/6 आहे. जी श्रीलंकेने 2007 मध्ये केनियाविरुद्ध केली होती. जोहान्सबर्गमध्ये नाणेफेकीने फारसा फरक पडत नाही. कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 26 पैकी 13 सामने जिंकले आहेत. भारताने 2023 मध्ये येथे शेवटचा टी20 सामना खेळला होता. तेव्हा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
वांडरर्स स्टेडियमची टी20 रेकॉर्ड
खेळलेले सामने: 33
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने: 16
नंतर फलंदाजी करताना जिंकलेले सामने: 17
नाणेफेक जिंकल्यानंतर जिंकलेले सामने: 13
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या: 174
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत. टी20 हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताचा दबदबा आहे. भारताने 17 सामने जिंकून आपला दबदबा कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताकडून 12 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. सूर्या ब्रिगेडने गेल्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेतील टी20 मालिका जिंकण्याची संधी गमावली होती. जी 1-1 अशी बरोबरीत संपली होती. त्यानंतर एक सामना पावसाने गमावला. भारत आता 3-1 असा विजय मिळवून ती कामगिरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा-
हे तीन खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माचे उत्तराधिकारी, माजी क्रिकेटपटूचा विश्वास
इतिहास घडला! मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या!
IND vs AUS: विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, सराव सामन्यातही धावा निघेना!