घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेला ९ जूनपासून सुरूवात होणार आहे. यामध्ये एकूण पाच टी२० सामने खेळले जाणार आहेत. तर यातील पहिला सामना दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. दिल्लीच्या सामन्याआधी युजवेंद्र चहल याने नवा लुक केला आहे. त्याने आलिम हकीम या प्रसिद्ध हेयर ड्रेसरकडे केसांची नवीन स्टाईल केली आहे. याचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर देखील पोस्ट केले आहेत.
तसेच हाकिम यानेही ‘समर सिजनसाठी युजवेंद्रचा फ्रेश लुक’ असे कॅप्शन देत इन्स्टाग्रावर फोटो शेयर केले आहेत. या पोस्टला चाहत्यांनी विनोदी कमेंट्सही केल्या आहेत.
हकीम याच्याकडे सेलेब्रेटीसोबतच क्रिकेटपटूही हेयरकट करण्यास येतात. विराट कोहली, एमएस धोनी, केएल राहुल, श्रेयस अय्यर असे अनेक क्रिकेटपटू त्याच्याकडे येऊन गेले आहेत.
https://www.instagram.com/p/CeVTU8bLDkL/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय संघाकडून मर्यादित षटकांचे सामने खेळणाऱ्या चहलला मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकासाठी संघातून वगळले होते. यामुळे नाराज न होता त्याने चांगली कामगिरी करण्यावर भर दिला. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १७ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या. या हंगामात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्याने पर्पल कॅपवर आपला हक्क बजावला.
चहलने भारताकडून ५४ टी२० सामने खेळताना ६८ विकेट्स मिळवल्या आहेत. तर या मालिकेत पुन्हा एकदा कुलचा जोडी पाहायला मिळणार आहे. कारण चहल बरोबरच कुलदिप यादव याची पण संघात निवड झाली आहे. तसेच अक्षर पटेल आणि रवि बिश्नोई यांनाही संधी मिळाल्या आहेत.
या मालिकेसाठी भारतीय संघ ५ जूनला दिल्लीला रवाना होणार असून दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच तेथे पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, इशान पटेल, अक्षर पटेल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुयदिप यादव, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल आणि उमरान मलिक.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकी कर्णधार पाहतोय मोठी स्वप्ने; म्हणे, आयपीएलमध्ये खेळायचंय, तेही कर्णधार म्हणून
एका मिसळ पावच्या किंमती एवढं महाग श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मॅचचं तिकीटं
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती