भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकी दिग्गज डेल स्टेनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यांमध्ये ऋतुराज अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही, पण तिसऱ्या सामन्यात त्याचे प्रदर्शन महत्वपूर्ण राहिले. तिसऱ्या सामन्यातील त्याचे अर्धशतक पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. डेल स्टनने देखील त्याचा एक गुणवंत खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ऋतुराजने अवघ्या ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या १० षटकांमध्ये त्याने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) धुवादार प्रदर्शन करताना दिसला. एनरिक नॉर्कियाच्या एका षटकात ऋतुराजने लागोपाठ ५ चौकार ठोकले. त्याचे हे प्रदर्शन पाहून आफ्रिकी संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) देखील प्रभावित झाला.
माध्यमांशी बोताना डेल स्टेन म्हणाला की, “जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करता, तेव्हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करता. तो कागिसो रबाडा असू शकतो किंवा लॉकी फर्ग्युसन असू शकतो. एका सामन्यात तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. नशीब त्याच्यासोबत होते, ते देखील तुम्ही स्वतः बनवता. मागच्या दोन वर्षात त्याने खूप चांगली फलंदाजी केली आहे. याच्या आधी तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो एक जबरदस्त आणि गुणवंत खेळाडू आहे.”
स्टेन पुढे बोलताना म्हणाला की, “ऋतुराज गायकवाडची खास गोष्ट ही आहे की, त्याला वेगवान किंवा फिरकी कोणत्याही गोलंदाजाच्या विरोधात खेळताना अडचण येत नाही. तो चेंडूला चांगल्या प्रकारे समजू शकतो. गायकवाड आक्रामक खेळाडू वाटत नाही आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करतो, जशी केएल राहुल करतो.”
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये ऋतुराज चाहत्यांच्या आणि सीएसकेच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. असे असले तरी त्याने हंगामातील १४ सामन्यांमध्ये ३६८ धावा केल्या. आयपीएलनंतर भारतीय संघाच्या निवडकरत्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडले. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने जरी अर्धशतकी खेळी केली असली तरी, पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने चांगलीच निराशा केली होती. पहिल्या सामन्यात २३, तर दुसऱ्या सामन्यात अवघी एक धावा करून त्याने विकेट गमावली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘चहलला टी२० विश्वचषकासाठी संघात घेऊ नये!’, भारताच्या माजी दिग्गजाने सांगितले कारण
आता विदेशी खेळाडूही ‘या’ भारतीयाच्या तालावर नाचणार, आयसीसीने एलीट पॅनलमध्ये केले रिटेन
भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया