भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका नुकतीच पार पडली. भारताने या मालिकेत 2-1 अशा अंतराने विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी या मालिकेत चांगले प्रदर्शन केले. अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील संघात पुनरागमन झाल्यानंतर सतत चांगले प्रदर्शन करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्याने महत्वाची भूमिका पार पडली. भारताला आता 28 सप्टेंबर पासून मायदेशात दक्षिण आफ्रिका संघासोबत टी-20 मालिका खेळायची आहे. परंतु त्याआधीच हार्दिकने संघाची साथ सोडून स्वतःच्या खास दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.
एनसीएमध्ये कंडीशनिंगसाठी जाणार हार्दिक पंड्या –
दक्षिण आफ्रिका संघाला भारत दौऱ्यात तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी, 28 सप्टेंबरला तिरुवनंतपूरमला खेळला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे गुवाहाटी आणि इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे दोन प्रमुख खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार () यांना या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. विश्रांतीच्या काळात हार्दिक बेंगलोरसाठी रवाना झाला आहे. त्याला याठिकाणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीमध्ये कंडीशनिंगसाठी बालावले गेले आहे. आगामी टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या महत्वाची भूमिका पार पाडणार असल्यामुळे संघ त्याच्या फिटनेसविषयी अधिकच काळजी घेत असल्याचे दिसते. एनसीएमध्ये कंडीशनिंग झाल्यानंतर हार्दिक 5 ऑक्टोबरला संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल असे सांगितले जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील हार्दिकचे प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक होते. कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजीची देखील संधी दिली. संघासाठी त्याची गोलंदाजी किफायतशीर ठरली, पण विकेट मात्र मिळाली नाही. फलंदाजी करताना हार्दिकने पहिल्या टी-20 सामन्यात नाबाद 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आणि 9 धावा करून तो बाद झाला. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यायत हार्दिकने 25 धावांची खेली केली होती. आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषकात भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
या चार चुका सुधरा अथवा वर्ल्डकप विसरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान
चार्ली डीनला आधीच दिलेली वॉर्निंग, ‘रन-आउट’च्या वादावर दिप्ती शर्माने सोडले मौन
रेकॉर्ड अर्लट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भन्नाट खेळणाऱ्या किंग कोहलीचा विक्रम, ठरला केवळ दुसराच क्रिकेटपटू