न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेकडे लागल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये चार सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील चार सामने डरबन, गक्केबरहा, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे खेळले जातील. भारताचा वरिष्ठ संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. चला तर मग, या बातमीद्वारे या मालिकेबाबत सर्वकाही जाणून घ्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेतील पहिला सामना 8 नोव्हेंबर रोजी डरबन येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होईल. मालिकेतील दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी गक्केबरहा येथे रात्री 7.30 वाजल्यापासून खेळला जाईल. तिसरा सामना सेंच्युरियन येथे रात्री 8.30 वाजता आणि चौथा सामना जोहान्सबर्ग येथे रात्री 8.30 वाजता खेळला जाईल.
टी20 मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ
भारत – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल
दक्षिण आफ्रिका – एडन मार्करम (कर्णधार), ओटेनिल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहाली पोंगवाना, नकाबा पिटार, रायन रिक्लेटन, लुइथेला सिम्थेला, लुइथेमा (तिसरा आणि चौथा सामना), ट्रिस्टन स्टब्स
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिका स्पोर्ट्स-18 नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय तुम्ही जिओ सिनेमावर मालिकेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.
हेही वाचा –
निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये का खेळायचं आहे? 42 वर्षीय जेम्स अँडरसननं सांगितलं कारण
भारतीय फलंदाज सराव सामन्यातही ढेपाळले, बॉर्डर-गावस्कर मालिकेत काय होणार?
रणजी सामन्यातील निर्णयावर संतापला ऋतुराज गायकवाड, व्हिडिओ शेअर करून विचारले बोचरे प्रश्न