भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाला वाटते की, तिघांव्यतिरिक्त देखील भारतीय संघ कडवे आव्हान देईल. मालिका सुरू होण्यापूर्वी बावुमाने खास प्रतिक्रिया दिली.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) म्हणाला की, “भारतातील परिस्थिती पूर्णपणे ऑस्ट्रेलियातील परिस्थितीनुसार नाहीये, पण तरीही ही मालिका खेळून खूप फायदा मिळेल. कोणत्याही प्रकारचे प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळणे आमच्यासाठी फायद्याचेच आहे. आम्ही या सामन्यांचा वापर खेळाडूंसाठी करू. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे की, संघात त्यांची भूमिका काय आहे.”
भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचेही कर्णधार बावुमाने सांगितेल. तो म्हणाला की, “आम्ही टी-२० संघात काही नवीन चेहरे सहभागी केले आहेत. त्या खेळाडूंना संधी दिली जाईल, जेणेकरून पाहता येईल की, ते कोणती भूमिका पार पाडू शकतात.”
आगामी मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार आहे. याविषयी बोलताना बावुमा म्हणाला की, “हा निश्चितच नवीन अंदाजातील भारतीय संघ आहे. अनेक खेळाडूंनी नुकत्याच खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि त्यांनी संधी दिली गेली आहे, पण आमच्या नजरेने पाहिले, तर आम्ही याकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहोत. आम्ही याला ‘बी’ संघ म्हणून पाहत नाही. भारतीय संघाविरुद्ध आम्ही खेळलो आहोत. त्यामुळे माहिती आहे की, ते प्रेरणेने भरलेले असतील आणि प्रतिस्पर्धेत कोणतीच कमी राहणार नाही.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली असली, तरी संघात युवा खेळाडूंची भरमार आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदात संघात निवडले गेले आहे. आता त्यांना पदार्पणची संधी मिळते की नाही, हे मात्र पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताचा संघ पाकिस्तानवर पडणार भारी’, हरभजनला उत्तर देताना टीम इंडियाबद्दल अख्तरचे मोठे विधान
राशिदने आयपीएलमध्ये ‘स्नेक शॉट’ने घातलेला धुमाकूळ, आता सराव करतानाचा Video तुफान Viral
भविष्यात कसोटी धोक्यात, पण ‘हे’ ३ देश वाचणार, आयसीसीच्या अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य