भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघातील बऱ्याचशा अनुभवी वेगवान गोलंदाजांचे या मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले आहे. अशात प्लेइंग इलेव्हनविषयी पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता माजी वेगावान गोलंदाज आशीष नेहरा (aashish nehra) याने संघाला याबाबतीत एक सल्ला दिला आहे.
टी-२० विश्वचषकातनंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत संघातील वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती दिली गेली होती. आता या गोलंदाजांनी संघात पुनरागमन केले आहे. अशात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे आणि तिसऱ्या वेगवान गोलंदाजच्या रूपात इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज हे पर्याय संघाकडे आहेत.
अशातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहराने पहिल्या सामन्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात मोहम्मद सिराज (mohammad siraj) याला संघीत सामील करण्याचा सल्ला दिला आहे.
नेहरा म्हणाला की, “हे पाहा, मला वाटते की, बुमराह आणि शमी भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणातील ऑटोमॉटीक चॉईस आहेत. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाविषयी बोलायचे झाले तर, मोहम्मद सिराज ही व्यक्ती असू शकतो. ईशांतला (शर्मा) दुखापत झाली होती आणि नंतर तो न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. परंतु सिराजने त्या सामन्यात खूप चांगले प्रदर्शन केले होते. पण हे संघ व्यवस्थापनाच्या विचारावर आणि रणनीतीवर देखील अवलंबून असेल.”
हेही वाचा – पुजाराला आला टीम मॅनेजमेंटचा खास मैसेज, रोहितच्या अनुपस्थित दिली ‘मोठी जबाबदारी’
“पण चांगली गोष्ट ही आहे की, भारताकडे खूप पेस बॅट्री (वेगवान गोलंदाज) आहे आणि त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत. त्यांच्याकडे उमेश (यादव) सारखा वेगवान गोलंदाज आहे, ज्याच्याकडे कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ही एक चांगली स्थिती आहे,” असे नेहरा पुढे बोलताना म्हणाला.
नेहराच्या मते या वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त शार्दुल ठाकुर देखील संघात आहे. शार्दुल अष्टपैलूच्या रूपात संघात स्थान बनवू शकतो. तत्पूर्वी शार्दुलने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात चांगले अष्टपैलू प्रदर्शन केले होते.
महत्वाच्या बातम्या –
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…
हॅट्रिक ते ४०० कसोटी विकेट्स, ‘या’ ४ विक्रमांमध्ये हरभजन सिंगची बरोबरी करणे नाही सोपे काम..!
प्रो कबड्डी २०२१ : ‘दबंग दिल्ली’ ठरली ‘यू मुंबा’वर भारी, जोरदार पुनरागमनासह ३१-२७ ने जिंकला सामना
व्हिडिओ पाहा –