भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाची प्रत्येक चाल अगदी योग्यच होती. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो अगदी योग्य ठरला. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ 283 धावा करण्यात यशस्वी ठरला. या दोघांनी दीर्घकाळ स्मरणात राहील अशा पद्धतीने फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. जी भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 47 चेंडूत 9 चौकार आणि 10 षटकार मारत 120 धावा केल्या. त्याचे हे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. टी20 मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतके करणारा तो एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी गुस्ताव मॅककॉन, रायली रुसो, फिल सॉल्ट, संजू सॅमसन यांनी ही कामगिरी केली आहे. आता तिलक वर्माने या फलंदाजांची बरोबरी केली आहे.
शतक झळकावल्यानंतर, तिलक वर्मा आता भारतीय संघासाठी टी20 द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडला. तिलकने आफ्रिकेविरुद्धच्या टी20 द्विपक्षीय मालिकेत दोन शतकांसह एकूण 280 धावा केल्या आहेत. तर कोहलीने 2021 साली इंग्लंडविरुद्धच्या टी20 द्विपक्षीय मालिकेत एकूण 231 धावा केल्या होत्या. आता तिलक वर्मा विराटला मागे टाकले आहे.
तिलक वर्मा हा भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावले. टीम इंडियासाठी टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.
टी20 मध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज:
रोहित शर्मा- 35 चेंडू
संजू सॅमसन- 40 चेंडू
तिलक वर्मा- 41 चेंडू
सूर्यकुमार यादव- 45 चेंडू
केएल राहुल- 46 चेंडू
हेही वाचा-
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले
संजू सॅमसनच्या शॉटमुळे महिला जखमी झाली, थेट गालावरचा लागला चेंडू!
IND vs SA: संजू सॅमसन नाही तर या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?