भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना लखनऊ येथे खेळला गेला. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 धावांनी यजमान संघाला पराभूत केले. यामुळे त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळला जाणार आहे. रांचीचे स्टेडियम भारतासाठी अनलकी ठरले आहे. मागील काही सामन्यांचा निकाल पाहता तो आपल्याला लक्षात येईल. चला तर मग जाणून घेऊ एमएस धोनीच्या रांचीतील भारताचे विक्रम.
या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. भारताला या मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असेल तर काहीही करून रांचीमध्ये खेळला जाणारा दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे, मात्र भारताचे या मैदानावर चांगले विक्रम नाही. भारताने 2014 नंतर येथे खेळलेला एकही वनडे सामना जिंकलेला नाही.
भारताने 2014 नंतर रांचीमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. 2019मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात भारत 32 धावांनी पराभूत झाला होता. त्याआधी 2016मध्ये भारत न्यूझीलंडशी भिडला होता. त्या सामन्यातही यजमान संघ 19 धावांनी पराभूत झाला होता. अशात भारताची स्थिती जिंकण्यासाठी करो वा मरो अशी झाली आहे. त्यातच भारताला या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांची कमी जाणवणार आहे, कारण विराटचा रांचीत रेकॉर्ड जबरदस्त आहे.
विराटने रांचीमध्ये 5 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये 192च्या सरासरीने आणि 2 शतकांच्या सहाय्याने 384 धावा केल्या आहेत. भारताने येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो सामना गमावला होता त्यामध्ये विराटने 314 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 95 चेंडूत 123 धावा केल्या होत्या.
तसेच भारताने 2014च्या आधी या स्टेडियमवर 3 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामने भारताने जिंकले तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. 2013मध्ये भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने आणि 2014मध्ये श्रीलंकेला 3 विकेट्सने पराभूत केले होते.
या मालिकेत भारताचा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत असून त्याने पहिल्या सामन्यात लवकरच आपली विकेट गमावली होती. त्याचबरोबर शुबमन गिल यानेही 3 धावा करत तंबूचा रस्ता गाठला होता. दोन्ही सलामीवीर धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारताला सामना गमवावा लागला. यामुळे या दोघांनाही दुसऱ्या सामन्यात चांगली सुरूवात करावी लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! क्रिकेटनंतर ‘या’ खेळात नशीब आजमावणार सचिन आणि धोनी? लेटेस्ट फोटो व्हायरल
चेतेश्वर पुजारा पुन्हा दिसला ब्ल्यू जर्सीत, खेळणार का टी20 वर्ल्डकप? पोस्ट व्हायरल