भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत केले. रविवारी (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळला गेलेला हा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. यामुळे भारताने तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली यांनी चमकदार खेळी केली. तसेच मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदौर येथे खेळला जाणार आहे. यासाठी विराट-राहुल यांना भारतीय संघातून वगळले आहे.
रिपोर्टनुसार, भारताचा उपकर्णधार केएल राहुल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20साठी विश्रांती दिली आहे. विराट हा सोमवारी (3 ऑक्टोबर) मुंबईला रवाणा झाला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, “त्यांना (विराट आणि केएल राहुल) तिसऱ्या टी20साठी आराम देण्यात आला आहे.” भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी20 सामना झाल्यावर मुंबईला जाणार आहे, कारण भारत ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी 6 ऑक्टोबरला मुंबईतून निघणार आहे.
राहुलने दुसऱ्या टी20 सामन्यात 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामुळे तो सामनावीराचा मानकरी देखील ठरला. त्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. विराटने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव याच्यासोबत 102 धावांची भागीदारी केली. विराटने 28 चेंडूत 49 धावा केल्या.
विराटला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतही आराम दिला गेला होता यावरून चर्चांना उधान आले होते. तेव्हा त्याने बॅटला हातदेखील लावला नव्हता. नंतर त्याने आशिया चषक 2022मध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने जवळपास तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके केले होते. आता तो तिसऱ्या टी20मध्ये खेळणार नाही असे रिपोर्ट्स पुढे येत असताना त्याच्याजागी कोण हा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दीपक हुड्डा हा दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या अंतिम अकरामध्ये श्रेयस अय्यर याला संघात घेतले जाऊ शकते. विराटने आशिया चषक ते दक्षिण आफ्रिका यादरम्यान खेळल्या गेलेल्या 10 डावांमध्ये 404 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 141.75 राहिला आहे. यामध्ये त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके केली आहे. राहुलने देखील आशिया चषक ते दक्षिण आफ्रिकेदरम्यान 10 सामन्यांत खेळताना चार अर्धशतकांच्या सहाय्याने 306 धावा केल्या आहेत. चाहत्यांना आता हे दोघे थेट टी20 विश्वचषकात दिसतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’